ताज्या घडामोडी

आशासेविका व गतप्रवर्तकांचा संप सुरूच

[ आशासेविका व गतप्रवर्तकांचा संप सुरूच

चांदवड तालुका प्रतिनिधी-सुनील सोनवणे

चांदवड तालुक्यातील आशा सेविका यांनी तालुका आरोग्य अधिकारी व चांदवड नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दि 14 जून 2021 रोजी निवेदन दिले.यात नमूद केले आहे की महाराष्ट्र राज्यात कोविड चा प्रादुर्भाव वाढल्यानंतर निर्बंध लागू करून शासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे,यात आशा स्वयंसेविका व गतप्रवर्तक यांचा सक्तीने समावेश करण्यात आला.घरोघरी जाऊन विविध तपासण्या करणे,रेकॉर्ड ठेवणे अश्या जबाबदाऱ्या आशा सेविकांवर देण्यात आल्या.त्यामुळे आशसेविकांनी मागणी केली आहे की 18000 रु वेतन म्हणजेच मासिक पगार देण्यात यावा.मानधन नको मासिक पगार द्या.माझे कुटुंब माझी जबाबदारी मधील कामे आशास्वयंसेविकांवर लादण्यात अली व कामे करून घेतली,अश्या प्रकारे 72 पेक्षा जास्त कामे आशासेविकाना करावी लागतात मात्र योग्य तो मोबदला मिळत नाही.
[16/06, 5:58 pm] Sonawane sunil: आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचेबरोबर आज मुंबई येथे आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या पदाधिकारी यांची मिटींग झाली परंतु चर्चा समाधान कारक झाली नाही त्यामुळे संप चालुच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close