ताज्या घडामोडी

भुजबळ यांनी मंत्रमुग्ध होत त्या चिमुकलीचे गाणे ऐकत तिच्या गाण्याला दाद दिली व तिचे कौतुक केले.

पालकमंञी झाले मंजुळ आवाजाने अकर्षित….

येवला तालुक्यातील नांदूर या छोट्या गावातील श्री.गौतम पगारे यांची कन्या कु.आम्रपाली हिने आज आपल्या आवाजात मंत्री छगन भुजबळ यांना गाणे ऐकवले.

यावेळेस भुजबळ यांनी मंत्रमुग्ध होत त्या चिमुकलीचे गाणे ऐकत तिच्या गाण्याला दाद दिली व तिचे कौतुक केले.
यावेळी उपस्थित नागरिक आम्रपालीच्या गाण्याने भारावून गेले.
संगीत क्षेत्राची कुठलीही पार्श्वभूमी नसतांना स्वयं मेहनतीने रियाजाने आम्रपाली हीने आपला आवाज जपला आहे.
संगीत क्षेत्रात तिचे भविष्य उज्वल असून तिला शक्य तेवढी मदत करण्याचा शब्द यावेळेस भुजबळ यांनी आम्रपाली व तिच्या वडिलांना दिला.
आम्रपाली हिने प्राथमिक शाळा पासूनच आपला छंद जोपासला आहे.

*अप्रतिम,,जणू काही जुन्या चित्रपट मधील गायिकच,,, सुप्त गुणांना वाव मिळाला तर ग्रामिण भागातील कलाकार आपल्या कलाकौशल्याचा जोरावर देशभर नाव करू शकतात,,, गरज आहे ती प्रोत्साहन अन त्यांना व्यासपीठ उपलब्ध होण्याची.माणुसकी फाऊंडेशन यासाठी नक्कीच प्रयत्नशील असेल.ही मुलगी आहे येवला तालुक्यातील नांदूर या छोट्याशा गावातील शेतकरी गरीब कुटुंबातील.*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close