ताज्या घडामोडी

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ह्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आणि युवासेना ह्यांच्यावतीने वृक्षारोप नगरसेवक संकेत भासे ह्यांचा पुढाकार

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ह्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आणि युवासेना ह्यांच्यावतीने वृक्षारोप
नगरसेवक संकेत भासे ह्यांचा पुढाकार

नेरळ :-दिपक बोराडे

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ह्यांचा आज जन्मदिवस.ह्या दिवसाचं औचित्य साधून कर्जत-खालापूर विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना आणि शिवसेनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
कोरोना काळात ऑक्सिजनचा भासलेला तुटवडा लक्षात घेता वृक्ष संवर्धन आणि लागवड करणे गरजेचे आहे.
कर्जत हे हिरव्यागार नवलाईने नटलेलं निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं छोटंसं शहर आहे. त्यामुळे कर्जतचं सौंदर्य अबाधित ठेवून नंदनवन बनवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत.पर्यटनाच्या दृष्टीने कर्जत शहराला विशेष महत्व प्राप्त असल्याने कर्जतच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावा आणि त्यांचं संवर्धन करा असे आवाहन आज शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने करण्यात आले.वृक्षारोपण कार्यक्रमासाठी एकता नगर दहिवली येथील रहिवासी आणि सामाजिक कार्याची आवड असणारा तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

नगरसेवक संकेत भासे ह्यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करून संवर्धनाची शपथ सर्वांनी घेतली. सदर ठिकाणी
शिवसेना पदाधिकारी पंकज पाटील , युवासेना उप तालुका अधिकारी प्रसाद थोरवे, माजी उप शहर प्रमुख अभिषेक सुर्वे ,शिवसेना उप विभागप्रमुख दहिवली विशाल बैलमारे,अजय सुवरणे,उदय जाधव ,हर्षद जाधव,वैभव खोपडे,विशाल खोपडे,प्रणित सपकाळ,विनायक गायकवाड,स्वप्नील शाहू ,चेतन देशमुख ,अतुल बोराडे,रोहित जाधव,अनिकेत कारांडे,प्रवीण बिबवे,ऋषिकेश जाधव,योगेश पवार ,रोहन नागोठकर आणि इतर तरुण उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close