आपला जिल्हाकृषीमहाराष्ट्र

कंत्राटदाराकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना कंपनीने आठ दिवसात पेमेंट दयावे ; मंत्री छगन भुजबळ यांच्या कडून कंपनीच्या मालकांना सूचना*

*कंत्राटदाराकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना कंपनीने आठ दिवसात पेमेंट दयावे ; मंत्री छगन भुजबळ यांच्या कडून कंपनीच्या मालकांना सूचना*

*शिवसाई एक्सपोर्ट कंपनीकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना आठ दिवसात पेमेंट मिळेल – छगन भुजबळ*

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

*नाशिक,(येवला),दि.१३ जून :-*

शिवसाई एक्सपोर्टकडून नेमलेल्या कंत्राटदाराने शेतकऱ्यांचे पैसे वेळेत दिलेले नाही. याबाबत कंपनीकडे तक्रार प्राप्त झाली असून आठ दिवसात फसवणूक झालेल्या शेतकाऱ्यांचे पेमेंट कंपनीने करण्याच्या सूचना कंपनीचे मालक व व्यवस्थापकांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी संयम राखावा त्यांना त्यांच्या शेतमालाचे पैसे मिळतील असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याप्रकरणी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांतअधिकारी व लासलगाव पोलीस स्टेशन येथे कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कंपनीचे मालक व व्यवस्थापकांना व शेतकऱ्यांना बोलवून बैठक घेत दाखल झालेल्या तक्रारीबाबत आढावा घेतला. यावेळी शिवसाई एक्सपोर्ट कंपनीचे मालक संभा शिवाराव, कंपनीचे सीईओ नरेश चौधरी, सीए शिवदास आव्हाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

यावेळी शिवसाई एक्सपोर्ट कंपनीने शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराला वेळेत पेमेंट दिले आहे. मात्र कंत्राटदाराने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे पैसे न देता फसवणूक केली आहे. याबाबत कंपनीच्या वतीने कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असून कंपनी शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे आठ दिवसांच्या आत देईल असे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तसेच आजवर गेल्या चार वर्षात कंपनीने २४० कोटी रुपयांचा मोबदला शेतकऱ्यांना दिला असून कंत्राटदाराने शेतकऱ्यांची १३ लाख रुपयांची फसवणूक केली असून यातून कंपनीला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन कंपनीने नेमलेल्या कंत्राटदरकडून शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. त्या कंत्राटदारावर कंपनीकडून कारवाई करण्यात येणार असून त्याच्याकडून शेतकऱ्यांच्या पैशांची वसुली करण्यात येणार आहे. शिवसाई एक्सपोर्ट कडून शेतकऱ्यांचा २० तारखेपर्यंत मोबदला देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम ठेवावा असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close