ताज्या घडामोडी

बँक ऑफ बडोदाच्या कळंब शाखेच्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार मनसे आक्रमक ……बॅंक व्यवस्थापनास निवेदन

बँक ऑफ बडोदाच्या कळंब शाखेच्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार
मनसे आक्रमक ……बॅंक व्यवस्थापनास निवेदन

नेरळ – दिपक बोराडे

कर्जत तालुक्यातील कळंब येथे असलेल्या बँक ऑफ बडोदा या शाखेचा दिवसेगणिक मनमानी कारभार वाढत चाललेला दिसुन येत आहे.याचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्जत तालुका च्या वतीने बँक ग्राहकांची होणारी गैरसोय या बाबत बँक ऑफ बडोदा कळंब शाखेला निवेदन देण्यात आले.
कर्जत तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेले कळंब या आदिवासी बहुल भागात बँक ऑफ बरोडा ची शाखा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.हा परिसर ग्रामीण भाग व आदिवासी वाड्या वस्त्याच्या असून येथील बहुतांशी नागरिक मराठी भाषिक असून हे सर्व या बँक ऑफ बडोदा बँकेचे खातेदार आहेत.या शिवाय आदिवासी खातेदार ही मोठ्या प्रमाणात आहेत ,
परंतु गेल्या काही दिवसांपासून बँक कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार चालत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
बँकेतील कर्मचारी वर्गाकडून मराठी भाषेचा वापर न होणे,काही कर्मचाऱ्यांना मराठी येत असूनही जाणूनबुजून आदिवासी खातेदारांशी हिंदीतून बोलणे, खातेसंबंधीत कामासाठी नेटवर्क ची समस्या सांगून सतत फेऱ्या मारायला लावणे, खातेदारांना रांगेत तिष्ठत ठेऊन भ्रमणध्वनी वर गप्पा मारने ,सर्वसामान्य ग्राहकांना अपमानास्पद दिली जाणारी वागणूक या अशा प्रकारच्या तक्रारी खातेदारांन कडून वाढू लागल्या होत्या ग्राहकांना कर्मचाऱ्यांकडून हीनतेची वागणूक दिली जात असल्याने
या अशा बँकेच्या मनमानी कारभार विरोधात मनसे आक्रमक होऊन त्यासंदर्भात बँक व्यवस्थापकास निवेदन देण्यात आले. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निर्णयानुसार बँकेत मराठी भाषेचा वापर व्हावा व अधिकारी वर्गाकडून खातेदारांना आदरपूर्वक वागणूक मिळावी अशी प्रमुख मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी कर्जत न.प मा. नगरसेवक धनंजय दुर्गे, मा.तालुका उपाध्यक्ष महेंद्र निगुडकर, तालुका उपाध्यक्ष अकबर भाई देशमुख, यशवंत भवारे,कर्जत शहर अध्यक्ष समीर चव्हाण, सचिव चिन्मय बडेकर,दहिवली पं स विभाग अध्यक्ष मंगेश गोमारे,कळंब पं स विभाग अध्यक्ष संजय पाटील मनविसे तालुका उपाध्यक्ष सतिश कालेकर, सहसचिव प्रवीण राणे,ओलमन ग्रा उपसरपंच अशोक पाटील, महाराष्ट्र सैनिक सागर कांबरी,नवनिष कांबरी, जितेंद्र राणे , भगवान माळी, निलराज विचारे, संदेश काळभोर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया :-

बँक कर्मचारी कडून ग्राहकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते तसेच मराठी भाषेचा वापर होत नाही,

संजय पाटील – (कळंब पं स विभाग अध्यक्ष मनसे)

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close