ताज्या घडामोडी

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सांगली शहरच्यावतीने व आमदार सुधिरदादा गाडगीळ युवा मंचतर्फे अनेक सामाजिक उपक्रम*

प्रतिनिधी प्रमोद भोरे सांगली*

प्रतिनिधी प्रमोद भोरे सांगली*

 

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सांगली शहरच्यावतीने व आमदार सुधिरदादा गाडगीळ युवा मंचतर्फे अनेक सामाजिक उपक्रम*

आमदार सुधीरदादा गाडगीळ , ज्येष्ठ नेते शेखर इनामदार ,मकरंदजी देशपांडे ,भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे- म्हैसाळकर , नीताताई केळकर याचा मार्गदर्शनामध्ये आमदार जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी , मंडप डेकोरेटर्स त्यांना धान्य वाटप करण्यात आले. व लहान मुलांना वही वाटपाचा कार्यक्रमचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये भारतीय जनता पार्टी महिला नगरसेवकांनी दीनदयाळ उपाध्याय कोविड केअर सेंटरमध्ये वृक्षारोपण करुन चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला .
कोरोना महामारीत सर्वच दृष्टीने कंबरडे मोडणार्या मंडप डेकोरेटर्स यांना आर्थिक आधार देत धान्य वाटप करण्यात आले . दुसऱ्या बाजूला कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला असून एक जबाबदारी म्हणून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते .त्याचवेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचतर्फे लहान बालकांना वहि वाटपाचा कार्यक्रमचा शुभारंभ आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते पार पडला . यामध्ये महिला नगरसेवकांनीही भाग घेत कोविड केअर सेंटरमध्ये वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला .
भारतीय जनता पार्टी व आमदार सुधीर दादा यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केलेले आहे . काम करण्याची भावना व वारसा कुणाकडूनही न घेता आपले काम चोख व तितक्याच तत्परतेने करण्यासाठी ते संपूर्ण सांगली बरोबर राज्यांमध्ये ओळखले जातात . याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय नगरसेवक ,पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.
*प्रतिनिधी प्रमोद भोरे सांगली*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close