ताज्या घडामोडी

शहीद दशरथ पाटील यांना शोकाकूल वातावरणात साश्रुपुर्ण निरोप

पोलीस टाईम न्युज प्रतिनिधी शिवाजी सुतार 7387418290

शहीद दशरथ पाटील यांना शोकाकूल वातावरणात साश्रुपुर्ण निरोप

वडगाव येथे अंत्यसंस्कार

वडगाव (ता. तासगाव) येथील भारतीय सैन्य दलातील २६ मराठा लाईफ इन्फंट्रीचे हवालदार दशरथ पोपट पाटील (वय ३९) यांना बुधवारी शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. वडगाव – अंजनी रस्त्यावर हवालदार दशरथ पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे बंधु तुकाराम पाटील यांनी भडाग्नी दिला.तसेच अनेक मान्यवरांनी दशरथ पाटील यांच्या पार्थिवास पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली.

हवालदार दशरथ पाटील जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये कार्यरत होते. सोमवारी सात जुन रोजी सकाळी अखनूर जम्मू (केएनटी) च्या खौर तालुक्यात जोगवानच्या नथू टिबा भागात नियंत्रण रेषेवर गस्त घालत असताना कपाळावर गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला.मंगळवारी रात्री हवालदार दशरथ पाटील यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे आणण्यात आले. बुधवारी सकाळी पार्थिव वडगाव या जन्मगावी आणण्यात आले. सुरुवातीला ते पार्थिव अंत्यदर्शनासाठी


गावातील शहीद महादेव पाटील कलामंचच्या शेजारी ठेवण्यात आले. यानंतर पार्थिव दशरथ पाटील यांच्या घरी नेण्यात आले. यावेळी आई, पत्नीसह नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.

दशरथ पाटील हे सन 2000 साली सैन्यदलात भरती झाले होते.वीस वर्षे त्यांनी सेवा बजावली.दोन महिन्यापूर्वीच त्यांची राज्यस्थानातील कोटा येथून जम्मू येथे देशसेवेत हजर झाल्याने पत्नी व मुलांना गावाकडे सोडून जम्मू येथे देशसेवेत हजर झाले होते. सोमवारी सात जून रोजी ड्युटी संपवुन परतत असताना झालेल्या चकमकीत जम्मूकाश्मिर येथील अकनूर येथे त्यांना वीरमरण आले.
जवान दशरथ पाटील हे शेतकरी कुटुंबातील आहेत.ते उत्कृष्ट खेळाडू होते सैन्य दलातील विविध स्पर्धेत विक्रमी यश संपादन केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दीड वर्षाचा मुलगा, नऊ वर्षाची मुलगी,आईवडील,भाऊ भावजय असा परिवार आहे.À

सजवलेल्या ट्रॅक्टरमधून पार्थिव अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आले. याठिकाणी २६ मराठा लाईफ इन्फंट्रीचे सुभेदार राजेंद्र बाजीराव दळवी, हवालदार सचिन जमादार, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पांडूरंग भोसले, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे संचालक सुरेश पाटील, पोलिस निरीक्षक संजीव झाडे, गट विकास अधिकारी दीपा बापट, सरपंच रमेश पवार, उपसरपंच सचिन पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील यांच्यासह कुटूंबीय आणि मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली अर्पण केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close