ताज्या घडामोडी

पदाचा गैरवापर करून निविदा प्रक्रियेत अनियमितता तसेच घोळ….! निविदा प्रक्रियेत अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची राज्य कंत्राटदार महासंघाची मागणी….!

शेवगाव , अहमदनगर ( जयप्रकाश बागडे ) (दि. ०९/०६/२०२१

पदाचा गैरवापर करून निविदा प्रक्रियेत अनियमितता तसेच घोळ….!

निविदा प्रक्रियेत अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची राज्य कंत्राटदार महासंघाची मागणी.…!

(शेवगाव , अहमदनगर ( जयप्रकाश बागडे )
(दि. ०९/०६/२०२१

सार्वजनिक बांधकाम ( ई.जी. एस. ) विभागातील काही अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून निविदा प्रक्रियेत अनियमितता केली. त्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी बोधेगाव येथील राज्य कंत्राटदार महासंघाचे जिल्हाअध्यक्ष समीर शेख व त्यांच्या संघटनेचे खजिनदार अक्षय कराड यांच्या वतीने बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदरील दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाने एका कामासाठी निविदा काढली. तिची अंतिम मुदत २२ मार्च २०२१ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत होती. परंतु या निविदेला कमी प्रतिसाद मिळाल्याने द्वितीय कॉलसाठी शासन निर्णयाप्रमाणे आठ दिवसांची मुदत देणे बंधनकारक होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून आठ दिवसांची मुदत देण्याऐवजी केवळ एका रात्रीची म्हणजे २३ मार्च २०२१ रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंतची मुदत दिली. यावरून निविदा प्रक्रिया मनमानी पद्धतीने राबविण्यात आल्याचे दिसते. याबाबत चौकशी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी गेले असता संबंधित अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेर निविदा काढावी, तसेच मागील दोन वर्षांतील निविदा प्रक्रिया, त्याबाबतचे शुद्धिपत्रक याची चौकशी करावी व पदाचा गैरवापर केल्याने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समीर शेख खजिनदार अक्षय कराड आदींनी केली आहे.

बातमी चौकट :-

सदरील निविदा प्रक्रियेत अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा संघटना मार्फत आमच्या मागणीसाठी उच्च न्यायालय येथे धाव घेणार आहे.

समीर शेख
जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ,अहमदनगर

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close